दिनांक 30 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत मुदतवाढ
पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा व जनजागृती स्पर्धेकरिता माहिती सादर करण्यास दिनांक 30 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असून सर्व सहभागी स्पर्धकांना (Final Submit केलेल्या व Final Submit न केलेल्या सर्व स्पर्धकांना) दिनांक 30 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत माहिती सादर (Update / Submit) करता येईल. तरी सर्व स्पर्धकांनी मुदतीत माहिती सादर करावी.

आपल्या माहितीपट/ पथनाट्याचा #pollutioncontrolcellthane या फेसबुक पृष्ठावरील अधिकतम लाईक्स असलेला फोटो (Screenshot) pcctmc.prana@gmail.com या ई-मेलवर दिनांक 31 मार्च, 2024 रोजी दुपारी 12:00 वा. पूर्वी सादर करावा. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या ई-मेलचा विचार करण्यात येणार नाही.

जनजागृती स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्पर्धा

राज्य शासनाद्वारे आयोजित माझी वसुंधरा अभियान 1.0 मध्ये ठाणे महानगरपालिकेस अमृत शहराच्या गटात प्रथम पारितोषीक प्राप्त झालेले आहे. तसेच, सदर पारितोषीक रकमेच्या विनियोगाची कार्यपद्धती शासनाद्वारे निश्चित करण्यात आलेली असून त्यापैकी काही रक्कम महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा अभियानामध्ये सहभाग वाढविणे व सदर रक्कम बक्षिस स्वरुपात वितरीत करण्यास निर्देशित आहे. त्यानुसार सदर स्पर्धेचे आयोजन ठाणे महानगरपालिकेद्वारे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे.

माझी वसुंधरा अभियानाचा मूळ पाया हा निसर्गातील पृथ्वी, वायु, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वावर आधारीत आहे. त्याच धर्तीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध घटकांमध्ये उदा. गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, इतर शासकीय कार्यालये/महाविद्यालये, इ. घटकांमध्ये निसर्गातील पंचतत्वावर आधारीत बाबींचा विचार करुन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

सदर स्पर्धेच्या आयोजनामुळे गृहसंकुले, शालेय संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, इतर शासकीय कार्यालये/ महाविद्यालये, इ. पातळ्यांवर राबविण्यात येणा-या पर्यावरण संवर्धनीय उपक्रमांना प्रोत्साहन देऊन सदर संस्था/नागरिकांना ठाणे शहराच्या पर्यावरण संवर्धनात सहभागी करुन घेता येईल.

या स्पर्धेमुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील उत्कृष्ट प्रकल्प ठाणे महानगरपालिकेस शासनाच्या मूळ माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभागी करुन घेता येतील.

स्पर्धेचे स्वरूप माहितीसाठी pdf डाउनलोड करा

जागरूकता स्पर्धा मार्गदर्शक तत्त्वे PDF

प्रभाग समिती क्षेत्र संबंध अधिकारी व कर्मचारी संपर्क क्रमांक यादी

macbook image
macbook image

सहभागी गट

माझी वसुंधरा अभियानाकरिता राज्य शासनाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या निकषांवर आधारीतच घटकांवर सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले खालीलप्रमाणे नमूद गटामध्ये स्पर्धा आयोजन होणार आहे.

सदर स्पर्धेमध्ये फक्त ठाणे महानगरपालिका हद्दीतीलच गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, सरकारी आणि व्यापारी संस्था, हॉस्पिटल, हॉटेल्स, वरिष्ठ महाविद्यालये, सरकारी कार्यालये, खाजगी कार्यालये सहभागी होऊ शकतील. सदर स्पर्धा राबविताना संपूर्ण ठामपा क्षेत्रातील अधिकतम संस्था /आस्थापनाना सहभागी होता यावे व भौतिक परिस्थितीनुसार सर्व प्रभाग समिती क्षेत्रांतून स्पर्धक सहभागी व्हावे याकरिता यशस्वी स्पर्धक निवड ही ठामपा प्रभाग समिती स्तरावर करण्यात येईल.

गुण वितरणाची पद्धत : (Self-Assessment Method)

सदर स्पर्धेत सहभागी होणा-या संस्था/ आस्थापनांना दिनांक १ एप्रिल २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीतील केलेल्या कामास अनुसरुन गुणांकन करावयाचे आहे. गुणांकन हे स्वयंमुल्य निर्धारण पद्धतीने (Self Assessment Method) करावयाचे असून संस्थेने स्पर्धा कालावधीत केलेल्या कामास अनुसरुन स्वतःलाच गुण वितरीत करायचे आहेत. वितरीत गुणांनुसार अधिकतम गुण प्राप्त संस्था / आस्थापनेची स्थळ पाहणी महापालिकेच्या मुल्यमापन समितीद्वारे करुन गुणांची पडताळणी करण्यात येईल व त्यानुसार एकूण गुण निश्चित करण्यात येतील. प्रत्येक उपक्रमाचे Geo टॅग फोटो सादर करणे बंधनकारक राहील, अन्यथा गुणांक ग्राह धरण्यात येणार नाही

अंतिम गुण निश्चित करण्याचा सर्वस्वी अधिकार मा. आयुक्त सो. यांचेद्वारे नियुक्त मुल्यमापन समितीचा असेल व त्या गुणांकनास आव्हान करता येणार नाही.

macbook image